www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड सरकार जमा केलाय. २००७ मध्ये राजीव शुक्ला यांच्या `बीएजी` या शिक्षण संस्थेला हा भूखंड देण्यात आला होता.
बाजारभावाने त्याकाळी सुमारे १०० कोटी रूपये किंमत असलेला हा भूखंड शुक्ला यांनी सरकारकडून केवळ १लाख रूपयांत पदरात पाडून घेतला होता. या वादग्रस्त जमीन वाटपाचा भांडाफोड झाल्यानंतर शुक्ला यांनी भूखंड परत करण्याचं आश्वासन दिलं होतं.
शुक्लांनी वादग्रस्त भूखंड परत केला असला तरी त्यांनी मागितलेल्या नुकसान भऱपाईबाबत अजून कोणताच निर्णय झालेला नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.