मुंबई : शिवसेनेने आंबेडकर भवनाच्या वादात पडण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी शिवसेनेला कानपिचक्या दिल्या आहेत. महापौरांची आंबेडकर भवन पुर्नबांधणीला स्थगिती देण्याची भूमिका योग्य नाही. महापौरांनी याउलट दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावा.
शिवसेनेने व्होटबँकेचे राजकारण करावे, परंतू चांगल्या कामामध्ये अडथळा आणू नये, असं ते म्हणाले. मला केंद्रीय मंत्रिपद दिल्यानंतर दलित वोटबँक भाजपकडं जाईल असं सेनेला वाटतंय. त्यामुळं सेनेने एवढ्या उशिरा भूमिका घेतली असली तरी मतांच्या राजकारणात सेनेला फायदा होणार नाही.