राणे, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली विधानसभा

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेय. तर निवडणूक समन्वय समिती अध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. याचवेळी राज्यात काँग्रेसने स्ववळावर लढण्याचा निर्णय घ्यावा, अशी चर्चा काँग्रेसच्या आजच्या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसा आग्रह धरण्यात आला. 

Updated: Aug 13, 2014, 08:42 PM IST
राणे, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली विधानसभा title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेय. तर निवडणूक समन्वय समिती अध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. याचवेळी राज्यात काँग्रेसने स्ववळावर लढण्याचा निर्णय घ्यावा, अशी चर्चा काँग्रेसच्या आजच्या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसा आग्रह धरण्यात आला.

विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे आजच्या काँग्रेसच्या बैठकीत निर्णय घेतला. ही बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित झाली. राष्ट्रवादीच्या दादागिरीला बळी पडू नका, असा सूर या बैठकीत उमटला. मात्र, विधान परिषद निवडणुकीतून माघार घ्यायची नाही, असे एकमत काँग्रेस बैठकीत झाले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

विधानसभेसाठी काँग्रेसचे प्रचार प्रमुख म्हणून नारायण राणे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेय. नाराज नारायण राणे यांच्यावर महत्वाची जबाबदारी देऊन काँग्रेसने राणे यांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे राणे आणि चव्हाण हे विधानसभा निवडणुतकीचे ओपनिंगचे फलंदाज असतील हे आात स्पष्ट झाले आहे.

राज्यात काँग्रेसने स्ववळावर लढण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली. हा निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळविला जाईल, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. तर निधानसभा निवडणुकीसाठी जाहिरनामा समितीचे प्रमुखपद सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.