स्वस्त फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये दिल्ली-मुंबई टॉप

तुम्हाला जर का पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याचा किंवा जेवण्याचा अनुभव घ्यायचा असेल

Updated: Apr 30, 2014, 05:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्हाला जर का पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याचा किंवा जेवण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आता कुठे देशाबाहेर जाण्याची गरज नाही. कारण "हॉटेल डॉट कॉम` या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत सगळ्यात जास्त स्वस्त हॉटेल्स उपलब्ध आहेत. या यादीत मुंबईने दुसरा नंबर पटकावला आहे.
२०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वांत कमी दरात म्हणजे ९ हजार ६५२ रुपयांमध्ये एका रात्रीसाठी राहता येत होते, तर मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ९ हजार ८०९ इतक्या रूपयांत राहता येत होते. हे दर जगात सर्वांत कमी असल्याने अहवालामध्ये या दोन शहरांची नोंद करण्यात आली आहे.
जगातील सर्वात महाग पंचतारांकित हॉटेल्सच्या शहरात न्यू यॉर्कचा नंबर पहिला लागतो. न्यू यॉर्कच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी ३८ हजार ९०४ रुपये लागतात. महागड्या पंचतारांकित हॉटेल्सच्या शहरांच्या यादीत सिंगापूर, लंडन, पॅरिस आणि मॉस्को या शहरांचा नंबर लागतो. इतर शहरांच्या यादीत दिल्ली आणि मुंबईचे पंचतारांकित हॉटेल स्वस्त असल्याने महाराष्ट्रात पर्यटकांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.