शारीरिक संबंधास नकार हा पतीवर मानसिक अत्याचारच

पत्नीने पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे म्हणजेच पतीवर मानसिक अत्याचार करण्यासारखे आहे असा निकाल कुटुंब न्यायालयाने दिला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 24, 2013, 04:13 PM IST

कुटुंब न्यायालयाने केला घटस्फोट मंजूर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पत्नीने पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे म्हणजेच पतीवर मानसिक अत्याचार करण्यासारखे आहे असा निकाल कुटुंब न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देतानाच न्यायालयाने पत्नीच्या क्रौर्याला बळी पडलेल्या एका नवरोबाचा घटस्फोटासाठी केलेला अर्जही मंजूर केला.
हे जोडपे डिसेंबर २००९मध्ये विवाहबद्ध झाले होते, परंतु दोनच महिन्यांत पत्नीने नवर्यापचे घर सोडले. आपली पत्नी नेहमी विनाकारण आपल्याशी भांडण करते, तसेच शारीरिक सुखाची मागणी करताच ही मागणी धुडकावून लावत ती आपला मानसिक छळ करते. त्यामुळे तिच्यापासून आपल्याला सोडचिठ्ठी द्यावी असा अर्ज या नवर्या ने कुटुंब न्यायालयात दाखल केला होता.
हे प्रकरण जेव्हा जेव्हा न्यायालयात सुनावणीस आले तेव्हा तेव्हा पत्नी गैरहजर राहिली. नोटीस बजावूनदेखील तिने न्यायालयात येणे टाळल्याने अखेर न्यायालयाने तिच्या गैरहजेरीतच नवर्याूचा घटस्फोट अर्ज मंजूर केला.
गेली तीन-साडेतीन वर्षे कुटुंब न्यायालयात चाललेल्या या घटस्फोटासंबंधीच्या खटल्यात पत्नीने एकदाही पतीचे आरोप फेटाळले नाहीत. त्यामुळेच आपण घटस्फोटाचा हा अर्ज मंजूर करीत आहोत असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.