रिलायन्सची `एक भारत एक दर` योजना

‘एक भारत, एक दर’ या नवीन घोषणेसहीत आणि योजनेसहीत ‘रिलायन्स कम्युनिकेशन’नं (आरकॉम) ग्राहकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 10, 2014, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘एक भारत, एक दर’ या नवीन घोषणेसहीत आणि योजनेसहीत ‘रिलायन्स कम्युनिकेशन’नं (आरकॉम) ग्राहकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय. मंगळवारी आरकॉमनं ही योजना जाहीर केलीय. या योजनेनुसार, ग्राहकांना स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉल्ससाठी एकच दर लागू होणार आहे.
दूरसंचार ऑपरेटरनं आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी 599 आणि 350 रुपयांचे दोन प्लान जाहीर केलेत. प्रीपेड ग्राहकांसाठी 45 रुपयांच्या पॅकचीही सुविधा देण्यात आलीय. यामध्ये रोमिंगमध्ये असताना इनकमिंग कॉल मोफत असतील तर आऊटगोईंग कॉल्ससाठी दर मात्र समान असेल.
रिलायन्स कम्युनिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला सर्वात प्रथम देशभरात ‘एक भारत एक दर’ योजना जाहीर करून आनंद झालाय. यामुळे देशातील रोमिंग, एसटीडी आणि स्थानिक कॉल्ससाठी वेगवेगळे दर संपुष्टात येतील.
या योजनेमुळे कंपनीला कॉर्पोरेट आणि एसएमई रोमिंग विभागात ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत मिळेल. 599 च्या प्लानमध्ये ग्राहकांना 1,200 मिनिटांचं आऊटगोइंग कॉल्स, रोमिंग, एसटीडी, स्थानिक कॉल, असीमित राष्ट्रीय इन्कमिंग रोमिंग फ्री, 2 जीबी डाटा आणि 100 एसएमएस मोफत अशी सुविधा मिळेल. मोफत मिनिटांच्या वापरानंतर कॉल दर 30 पैसे प्रति मिनिट असेल.
तर, 350 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 700 मिनिटांचे आऊटगोइंग कॉल्स, 200 मिनिट मोफत इनकमिंग रोमिंग, 1 जीबी डाटा आणि 100 एसएमएस अशी सुविधा मिळेल. मोफत इन्कमिंग मिनिटस समाप्त झाल्यानंतर कॉलदर 40 पैसे प्रती मिनिट असतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.