www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईतल्या खड्ड्यांचा प्रश्न गाजत असताना आज संध्याकाळी स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राजीनाम्याचा स्टंट केला. खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळलाय.
रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे मुंबईकरांना त्रास होतोय. त्याबद्दलच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांनी ही दिलगिरी व्यक्त करुन 24 तासही उलटत नाहीत, तोच खड्डे बुजवणा-या कंत्राटदारांनी ठाकरे यांची दिलगिरीही खड्ड्यात घातलीय.खड्ड्यांनी मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण केलीय... खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जाताना मुंबईकरांचा प्रचंड संताप होतो. त्याचं खापर मुंबई महापालिकेवर फुटतंय... म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतः या समस्येची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं.
ज्या रस्त्यांवर रात्री खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आलं, त्याच रस्त्यांवर सकाळी पुन्हा खड्डे अवतीर्ण झाले... रस्त्यांची कामं करणारे कंत्राटदार किती निर्ढावलेत याचीच ही साक्ष. साक्षात उद्धव ठाकरेंची दिलगिरीही खड्डयात घालणा-या या कंत्राटदारांवर तरी पालिकेतले सत्ताधीश कारवाई करतील का... खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत राहूल शेवाळेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.