मुंबई : डॉक्टरांच्या संपाचा सावळा गोंधळ सुरूच आहे. मुंबईत निवासी डॉक्टरांच्या संपात फूट पडलीय. मार्डचे पदाधिकारी कामावर रुजू झाले असले तरी सर्व निवासी डॉक्टर अजूनही कामावर रुजू झाले नाहीत. किंबहूना आता हा संप उस्फुर्तपणे सुरु असल्याचे काही निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जोपर्यंत आम्हाला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत कामावर जाणार नसल्याची भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतलीय. या संपाला गुरूवारपासून खासगी डाॅक्टरांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नेमका हा संप कुणाच्या प्रतिनिधीत्वाखाली सुरु आहे याबाबत संभ्रम असून संपाची पुढील भूमिका काय याबाबतंही निवासी डॉक्टरांमध्ये गोंधळ आहे. पण याचा फटका रुग्णांना बसत असून कामावर रुजू न होणा-या डॉक्टरांवर काय कारवाई करणार? सरकार हा तिढा कसा सोडवणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.