मुंबई : तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईतल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नसल्याने सर्वसामान्यांवर पैसे असूनही उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच मुंबई उपनरात एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकांचे हाल होत आहे. काही ठिकाणी पैसे असल्याचे बातमी मिळताच त्या एटीएमबाहेर रांगा दिसून येत आहे.
दरम्यान, अनेक एटीएम मशिन बाहेर नो मनी, असे फलक दिसून येत आहे. मार्च एडींग असल्याने आणि सलग दोन दिवस सुटी असल्याने पैसे एटीएममध्ये भरणा झाले नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज पाच ते सहा दिवस झाले तरी एटीएममध्ये पैसेच नसल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य लोकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.