मुंबई : 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय.
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला आज मुंबई उच्च न्यायलानं जामीन मंजूर केलाय. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरनं केलेल्या अर्जावर सुनावणीच्या वेळी आज मुंबई उच्च न्यायालायनं मालेगाव स्फोटाप्रकरणी तिला जामीन मंजूर केलाय. पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर साध्वीची जामीनावर मुक्तता आहे. शिवाय साध्वीला देशात किंवा परदेशी जाण्याआधी तपास यंत्रणांना त्याची माहिती द्वावी लागणार आहे.
विशेष एनआयए न्यायालयात एनआयएने साध्वीच्या जामिन अर्जावर हरकत घेतली नव्हती. पण विशेष एनआयए न्यायालयाने मात्र साध्वीच्या जामीन अर्जावर हरकत घेत मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याचे आदेश दिले होते. त्या आधारे साध्वीने मुंबई उच्च न्यायालयात जामिसाठी अर्ज केला होता. इथेही जामीन देण्यास हरकत नसल्याचं एनआयए म्हटलंय.
दरम्यान साध्वी सोबतच मालेगाव बॉम्स्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहीतला मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारलाय. कारण कर्नल प्रसाद पुरोहीतच्या जामिनाला एनआयएने विरोध केला होता. तसंच पुरोहीत विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा एनआयएने कोर्टात केलाय त्यामुळे प्रसाद पुरोहीतचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलाय.