...म्हणून शिवसैनिक किरीट सोमय्यांवर संतापले

भाजपचे खासदार किरीट सोमैय्यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.

Updated: Oct 11, 2016, 07:49 PM IST
...म्हणून शिवसैनिक किरीट सोमय्यांवर संतापले title=

मुलुंड : भाजपचे खासदार किरीट सोमैय्यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.

मुंबई महापालिकेच्या माफिया रावण दहनाचा कार्यक्रम सोमय्यांनी आयोजित केला होता. या प्रकारामुळं चिडलेल्या शिवसैनिकांनी तिथं जाऊन सोमय्यांना जाब विचारला. तसंच भाजप कार्यकर्त्यांना जोरदार धक्काबुक्कीही केली.

कार्यक्रमास्थळी एक बॅनर लावला होता. तो बॅनर शिवसैनिकांना खटकला आणि त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांनी याचा जाब विचारला आणि धक्काबुक्की केली. त्या बॅनरमध्ये मुंबई महापालिका माफिया दहन रावण असं लिहिण्यात आलं होतं. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचं याआधी देखील किरीट सोमय्यांनी मागे टीका केली होती.