मुंबई : शेअर बाजारात एक हजार अंकापेक्षा मोठी घसरण झाली आहे. शेअरबाजारात ३ टक्के घसरण झाली आहे. सर्वात मोठी घसरण बँकेच्या शेअर्समध्ये दिसून आली आहे. निफ्टीही २७५ अंकांनी घसरला आहे. एका डॉलरची किंमत ६६ रूपयांवर आली आहे.
शेअर बाजारात हा घसरणीचा भूकंप मानला जात आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी सध्या हातपाय मारण्याची गरज नाही. कोणताही शेअर सध्या खरेदी किंवा विक्री करण्याची गरज नाहीय, वेट अॅण्ड वॉचची परिस्थिती सध्या शेअर बाजारात आहे.
चीनमध्ये यूयॉनची किंमत सतत घसरत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.