www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पोलीसांना एका नव्या संकटाचा सामना करावा लागतोय. त्यांच्या समोरचं हे नवं संकट दहशतवादी किंवा गुंड टोळ्या नाहीतर सेक्स संबंधींच्या समस्यांचं आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचा-यांची वैद्यकिय चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ४० टक्के पोलीसांना नपुंसकत्वाच्या समस्यांनी ग्रासल असल्याचं समोर आलंय.
या पार्श्वभूमीवर पोलिस दलाकडून सेक्सॉलॉजीस्टची मदत घेतली जातेय. मुंबई पोलीस दलात ४० हजार पोलीस कर्मचारी आहे. मुंबईच्या लोकसंखेच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलीस कर्मचा-यांना १५ - १६ तास काम करावं लागंत..दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरची सतर्कता, विविध सण आणि बंदोबस्तामुळे पोलिसांना विना सुट्टीचं सतत काम करावं लागतं..अनियमीत जीवन शैली, खाण्यापिण्याची हेळसांड,कामाचा ताणतणाव या कारणामुळे पोलिसांमध्ये नपुंसकत्वाची समस्या वाढत आहे..
सेक्सच्या या समस्येवर मात करण्यासाठी आता मुंबई पोलिसांना सेक्स विषयक शिक्षण दिलं जात असून पोलिसांनीही आपल्या जीवन शैलीत बदल करण्याची आवश्यकता आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.