मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रकृती स्वास्थाच्या कारणामुळे रविवारी संध्याकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये. शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल बिघडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते.
मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुबी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रांट यांनी दिलीय. चिंतेचे कोणतेही कारण नाहीये. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे डॉक्टरांनी सांगितलेय.