मुंबई : आमच्यात आर.आर नाहीत यावर विश्वास बसत नाही, हा तळागाळातला नेता होता. ज्या प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी मला राजकारणात मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मी आर.आर. यांच्या पाठिशी होतो. आबांना येणारी प्रत्येक अडचण सोडवण्याचा प्रयत्न सतत करत होतो, असं शरद पवारांनी म्हटलंय.
प्रकृतीची चौकशी केली नाही, असा एकही दिवस गेला नाही
आर.आर. आबांच्या प्रकृतीच्या डॉक्टरांना फोन करून चौकशी केली नाही, असा माझा एकही दिवस गेला नाही. आमच्या राष्ट्रवादी कुटुंबातील ते एक होते, म्हणून प्रत्येक दिवशी कुणी ना कुणी आर.आर पाटील यांच्या भेटीला जात असे.
आबा नैतिकतेचे पाईक
आर.आर.पाटील यांच्याकडून कधीही राजीनामा मागितला नाही, नेहमीच नैतिकतेला साक्ष ठेऊन आबांनी राजीनामा दिला.
पवारांची आठवण
एकदा त्यांच्या प्रचाराला गेलो होतो, व्यासपिठासमोर खाली गर्दीत काही महिलांमध्ये दोन चेहरे होते, तेव्हा कुणीतरी सांगितलं या कोण आहेत हे माहित आहे का?
मला माहित नव्हतं?, तेव्हा सांगण्यात आलं, एक आबांची आई आणि दुसरी आबांची पत्नी आहे, अतिशय साधी राहणी, उच्च विचार सरणी आबांची होती.
मुलाचं शिक्षण गावाकडेच केलं
आबांनी मंत्र्याला मिळालेल्या बंगल्यात कधी परिवाराला राहायला आणलं नाही, आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवलं. त्यांचे आई-वडिल आजही शेतात काम राबायचे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं
आर.आर.पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागून घेतलं होतं. दुर्गम भाग असला, नक्षलवादी भाग असला तरी आर.आर महिन्यातून दोन वेळेस गडचिरोलीचा दौरा करत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.