मुंबई : 'आज तक' या हिन्दी चॅनेलने महाराष्ट्रातील महापालिकेवरील सर्वे केले आहेत, यात ठाण्यात पुन्हा शिवसेनाच किंग असणार असल्याचा अंदाज आहे. ठाण्यात शिवसेनेला ६२ ते ७० जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
तर दोन नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं सांगण्यात येत आहे, यामुळे भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचं 'आजतक'च्या सर्वेत म्हटलं आहे.
कारण राष्ट्रवादीला २९ ते ३४ जागा तर भाजपला २६ ते ३३ जागा मिळतील असा सर्वे आजतकचा आहे. काँग्रेसला मात्र ठाण्यात २ ते ६ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर ठाण्यात मनसेला एकही जागा नसल्याचं सर्वेत म्हटलं आहे.