राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज

सरकारविरोधात असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. 

Updated: Jul 21, 2016, 10:45 AM IST
राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज  title=

मुंबई : सरकारविरोधात असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. 

दोन वर्षे सत्तेत असूनही शिवसेना आमदारांना सत्तेत असल्यासारखे वाटत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना जास्त निधी दिला जातो, मात्र शिवसेना आमदारांची कामे होत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. 

शिवसेनेच्या नेत्यांनी यात वेळीच लक्ष घालावे, अन्यथा आमदारांच्या भावनांचा स्फोट होईल, असा इशाराच या आमदारांनी दिलाय. हीच स्थिती राहिली तर पुढील निवडणुकीत निवडून येणे अवघड असल्याची आमदारांची भावना आहे.