मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आलीय.
आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, महाराष्ट्रातील हिंदूंना संपवून टाकणाऱ्या शक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदुत्त्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये, असं आम्हाला वाटतं, पण ज्यांनी भगवा आतंकवाद असा शब्द प्रचारात आणला त्या शरद पवारांचा पाठिंबा घेऊ नये, असं उद्धव म्हणाले. जसं मी उत्तर दिलं, तसंच उत्तर भाजपकडून देण्यात यावं, अशी अपेक्षाही ठाकरेंनी व्यक्त केली. शिवसेना केंद्रातही वेगळा मार्ग स्वीकारणार, एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेतही उद्धव ठाकरेंनी दिले.
या सर्वांमध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी कदाचित आमचाही उमेदवार असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
- ६३ आमदारांची बैठक झाली, एकनाथ शिंदे यांची विधानसभेचे शिवसेनेचे गटनेते म्हणून निवड
- हिंदुत्त्ववादी शक्ती विभागू नये असं वाटतं, पण राष्ट्रवादीनं आधीच पाठिंबा दिलाय...
- भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असेल, तर आम्हाला त्यांच्यासोबत जाणं कठीण जाईल
- भगवा आतंकवाद हा शब्द शरद पवारांनीच आणला, त्याच शरद पवारांचा भाजप पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधात बसेल...
- आम्हालाही राज्यात स्थिर सरकार हवंय, पण अशा परिस्थितीत जाणार नाही
- अपमान सहन करून, लाचारी पत्करून सत्तेत राहायचं नाही- उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरेंचं 'एकला चलो रे'चा नारा...
- आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, महाराष्ट्रातील हिंदूंना संपवून टाकणाऱ्या शक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदुत्त्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये, असं आम्हाला वाटतं...
- जसं मी उत्तर दिलं, तसंच उत्तर भाजपकडून देण्यात येण्याची अपेक्षा आहे...
- शिवसेना केंद्रातही वेगळा मार्ग स्वीकारणार, एनडीएतून बाहेर पडण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत
- विश्वासमताबद्दल अध्यक्षांचं नाव कोणाचं येईल, यानंतर स्पष्ट करू...
- महाराष्ट्राच्या विभाजनाच्या मुद्द्याला आमचा विरोधच- उद्धव ठाकरे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.