मुंबई: शिवसेना-भाजपची सत्तास्थापनेची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेने विधिमंडळातील आपल्या पक्षनेत्याची निवड केली आहे. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत आमदार एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेली अनेक वर्षे ते शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेनेचा गड टिकवून ठेवण्याची महत्वाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी पार पाडली आहे.
08:35PM - शिवसेनेच्या संमतीने आम्ही अनिल देसाई यांचे मंत्रीपदासाठी नाव सुचवलं असता ते ऐनवेळी उनुपस्थित राहिले. मोदींचं हे निमंत्रण धुडकावणं हे एकुण दुर्दैवी. तात्विक मुद्द्यांवर चर्चाव्हावी पदं, संख्या व खात्यांवर चर्चा होऊ नये - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
07:50PM - राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःहून पाठिंबा देत असेल तर आम्ही काहीही करु शकत नाही - माधव भंडारी
07:49PM - आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊ असे कधीच म्हटले नाही - माधव भंडारी, भाजपा प्रवक्ते
07:06 PM - शिवसेना विरोधात बसणार, उद्धव ठाकरेंची बैठकीत भूमिका, एकनाथ शिदेंची गटनेतेपदी निवड
06:23 PM - विरोधी बाकांवर बसावं, शिवसैनिकांचा सूर
06:06PM - शिवसेना खासदार अनिल देसाई यांचे शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत, देसाई मुंबई विमानतळावर पोहोचले,तिथून शिवसेना भवनकडे रवाना होणार.
05:46PM - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले, केंद्रीय मंत्री अनंत गितेही शिवसेना भवनात दाखल, थोड्याच वेळात शिवसेना नेत्यांची बैठक.
05:39PM - उद्धव ठाकरे सेना भवनाकडे रवाना, थोड्याच वेळात बैठक होणार सुरू
05:19PM - गटनेतेपदी एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर - सूत्र, शिवसेनेची थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण बैठक
04:51 PM - अनिल देसाई काहीच वेळात मुंबईत दाखल होतील. त्यामुळं विमानतळावर शिवसैनिक जमा झाले असून शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन सुरू आहे.
03:20PM - भाजपाने राष्ट्रवाद काँग्रेसविषयी भूमिका स्पष्ट केली नाही - शिवसेना नेत्यांचा आरोप.
03:19PM - आज संध्याकाळी सहाच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता.
02:48PM - सुभाष देसाई, विनायक राऊत आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल.
02:31PM - शिवसेना खासदार अनंत गिते केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची शक्यता, आज संध्याकाळी शिवसेनेच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार, उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करणार.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना भवनात सेनेची बैठक सुरू असून शिवसेना गटनेत्याची निवड केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे सुरेश प्रभू शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल, आज सकाळीच भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.