ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 6, 2017, 11:42 PM IST
ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे. 

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी ही सुधारणा सुचवली होती. विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. आता सुधारणा करण्यात आलेले विधेयक सभेत सुधारणा सहित मंजूर करुन घ्यावे लागेल.

शिवस्मारकासाठी निधीची तरतूद काय?

दरम्यान, शिवस्मारकासाठी निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलाय. मोहन भिडे यांनी शिवस्मारकाच्या उभारणीला विरोध करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय.

या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हा सवाल उपस्थित केलाय. राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना शिव स्मारक उभारण्याचा अट्टाहास का असा सवाल हायकोर्टानं विचारलाय.. याबाबत तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.