मुंबई : मुंबई महापालिकेची स्वायत्तेची हमी मिळाली तर जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा देऊ असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
सोमवारी जीएसटीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजूरी देण्यासाठी विधीमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्याआधी उद्धव ठाकरेंनी केलंल हे विधान महत्वाचं मानलं जातं आहे.
काश्मीर आणि बलुचिस्तानविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतेली भूमिका योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेनं सुरू केलेल्या आरोग्य वाहिन्यांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उद्धव ठाकरेंनी हे विधान केलं आहे. आरोग्य वाहिनी लोकार्पण सोहळ्याच्या वेळी अंधेरीत पाच आरोग्य वाहिन्या सुरू करण्यात आल्या. येत्या वर्षभरात 1 लाख 25 हजार रुग्णांची तपासणी करण्याचं उदिष्ट यावेळी ठेवण्यात आलं आहे.