शोभा डेंचा मेंदू डोक्याच्या बाहेर- आव्हाड

शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 1, 2013, 07:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शोभा डेंच्या वक्तव्याचे विधिमंडळातही पडसाद उमटले आहेत. शोभा डे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलीय. भाजपचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधान परिषदेत ही मागणी केलीय. तर शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
राज ठाकरे संतापले
मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोपं नाही, हे शोभा डेंना बरोबर समजेल, अशी तिखट प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीय.
आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करताना तेलंगणा हे नवे राज्य अस्तीत्वात आणण्यात येत आहे. तसा केंद्र सरकारने स्वतंत्र राज्य निर्मितीला हिरवा कंदील दाखविला आहे. तेलंगणा राज्यावरून मुंबई आणि महाराष्ट्र का वेगळं नको, असं शोभा डे यांचं ट्विट केलं. हे त्यांना ट्विट महागात पडण्याची शक्यता आहे.
या ट्विटवरून राजकीय प्रतिक्रिया तात्काळ उमटल्यात. शोभा डे ! घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही, असं राज म्हणालेत. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली.

ही पेज थ्री पार्टीतली ओकारी – शिवसेना
राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेनेनंही लेखिका शोभा डे यांना लागलीच प्रत्यूत्तर दिलंय. महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करण्याची भाषा म्हणजे `ही पेज थ्री पार्ट्यांमधली ओकारी आहे` अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शोभा डे यांना सुनावलंय.

आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करताना तेलंगणा हे नवे राज्य अस्तीत्वात आणण्यात येत आहे. तसा केंद्र सरकारने स्वतंत्र राज्य निर्मितीला हिरवा कंदील दाखविला आहे. तेलंगणा राज्यावरून मुंबई आणि महाराष्ट्र का वेगळं नको, असं शोभा डे यांचं ट्विट केलं. हे त्यांना ट्विट महागात पडण्याची शक्यता आहे.
या ट्विटवरून राजकीय प्रतिक्रिया तात्काळ उमटल्यात. शोभा डे ! घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही, असं राज म्हणालेत. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली.
शोभा डेंची सारवासारव
वादग्रस्त वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर शोभा डेंनी सारवासारव केलीय. मुंबईबाबतचं ट्विटरवरील वक्तव्य आपण उपहासानं केल्याचा खुलासा शोभा डे यांनी केलाय. राज ठाकरे यांना उपहासातला विनोद कळतो असा टोलाही त्यांनी लगावलाय
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.