स्थानिकांनी लावली अनधिकृत झोपडपट्ट्यांना आग

मुलुंडच्या नीलमनगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे स्थानिकांबरोबर सर्वपक्षिय पदाधिका-यांनी या कारवाईत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 20, 2013, 04:00 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुलुंडच्या नीलमनगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे स्थानिकांबरोबर सर्वपक्षिय पदाधिका-यांनी या कारवाईत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
या अनधिकृत झोपड्यांविरोधात अनेक तक्रारी देवून सुद्धा महानगरपालिकाकडून कारवाई होत नव्हती. अखेर शिवसेना, मनसे, राष्टवादी आणि भाजपा कार्यकर्ते पुढे आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आंदोलन करत या झोपड्या स्वतः तोडल्या, काही झोपड्यांना आग लावून या झोपड्या जमीनदोस्त केल्या, हे सर्व चुकीचे चालले होते, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. अशी अनधिकृत बांधकामं होऊ नयेत. त्यामुळे संपूर्ण शहर विद्रूप होते या वर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लगेच कारवाई करायला हवी. परंतु, असे होत नाही म्हणून आम्हाला असे आंदोलन करावे लागते असे आंदोलकांचे म्हणणे होते.
जवळपास या २०० ते ३०० झोपड्या होत्या. मात्र हे आंदोलन होत असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.