मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ

मानखुर्द, घाटकोपर कुर्ला, टिळक नगर चेंबूर अशा विविध ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 21, 2017, 06:03 PM IST
 मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ  title=

मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ पाहायला मिळतोय. मानखुर्द, घाटकोपर कुर्ला, टिळक नगर चेंबूर अशा विविध ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत. मानखुर्दमध्ये मतदार, उमेदवार आणि कर्मचा-यांची बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आलं होतं. 

तणावही निर्माण झाला होता.  पोलीस सह आयुक्त देवेन भारती स्वतः जास्तीची पोलीस कुवक घेऊन घटना स्थळी पोहोचले. त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. या घोळानंतर निवडणूक आयोगाला याबद्दल कळवण्यात आलं. नवी यादी आणि जुनी यादी घेऊन  घोळ त्वरीत मिटवा, असे आदेश देण्यात आलेत. मात्र घरी गेलेला मतदार पुन्हा परत कसा येणार, असा सवाल विचारला जातोय.