हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्ववत

हार्बर रेल्वे मार्गावरील जीटीजी ते वडाळा स्टेशन दरम्यान रूळ तुटल्याने हार्बरची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. छत्रपती शिवाजी टर्मीनसकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान हार्बर रेल्वेची वाहतूक मेन लाईनवरून सुरू ठेवण्यात आली होती. आता वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 22, 2012, 10:40 AM IST

www.24taas.com,मुंबई
हार्बर रेल्वे मार्गावरील जीटीजी ते वडाळा स्टेशन दरम्यान रूळ तुटल्याने हार्बरची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. छत्रपती शिवाजी टर्मीनसकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान हार्बर रेल्वेची वाहतूक मेन लाईनवरून सुरू ठेवण्यात आली होती. आता वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
ऐन कार्यालयीन वेळेत ही घटना घडल्याने ऑफिसला जाणाऱ्यांची धावपळ उडाली. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. रूळ तुटल्याचे लक्षात येताच मध्य रेल्वे प्रशासनाने लगेचच सीएसटीकडे येणारी वाहतूक थांबवली. त्यामुळे सर्व गाड्या जागच्या जागीच थांबल्या होत्या.
अचानक उद्धभवलेल्या या परिस्थितीमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांना माहिती मिळत नसल्याने काहींनी प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून पायीच ऑफिस गाठणे पसंत केले. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी हार्बरची वाहतूक कुर्ला स्थानकापासून मेन लाइनवर वळविण्यात आली होती.