www.24taas.com,मुंबई
कसाबच्या फाशीनंतर आता संसदेवरील हल्ल्याप्रकरणी गुन्हेगार असलेल्या अफजल गुरूच्याही फाशीची मागणी पुढं आली आहे. भाजपनं अफजल गुरूला फाशी कशी देणार, असा सवाल सरकारला केला आहे.
कसाबच्या फाशीचं ठाण्यातील मुस्लिम समुदायानंही स्वागत केलंय. कसाबसारख्याच काही लोकांमुळे संपूर्ण मुस्लिम समुदाय बदनाम होतो. त्यामुळे अशा देशद्रोहींना फाशी देणं गरजेचंच आहे. तसंच अफजल गुरुलाही लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी ठाणे मुस्लिम समुदायानं केली आहे.
कसाबच्या फाशीबद्दल हिंदुमहासभेचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांनी न्याय व्यवस्थेचे अभिनंदन केले आहे. आता अफजल गुरूच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कसाबच्या फाशीमुळे चांगला संदेश गेला आहे. तसेच वाकडे डोळे करून बघणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशी यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यात कसाबला फाशी दिली गेली, हा नियतीने घेतलेला बदलाच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना महिला आघाडीच्या संघटक राधिका हरिश्चंरद्र यांनी व्यक्त केली.