www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत डेंग्युचं थैमान सुरू आहे. मुंबईत डेंग्युचे रूग्ण वाढत आहे.पाचजणाचा डेंग्यु बळी गेल्याचं मुंबई महापालिकेचा अहवाल सांगत आहे. या डेंग्युला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने शाळेच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थांना रस्त्यावर उतरवलं आहे. पालिकेच्या या डेंग्यु प्रतिबंधक यात्रेला सामाजिक संघटनांनी टिकेचं लक्ष केलं आहे.
डेंग्युच्या वाढत्या रूग्णामुळे मुंबई महापालिकेचं धाब दणाणलं आहे. ऑक्टोबर 2013 पर्यंन्त 1200 पेक्षा अधिक रूग्ण डेंग्युचे रूग्ण आढळले आहेत. तर 5 जणांचा डेंग्युने बळी घेतला आहे. 2008-09 मध्ये 682 इतके डेंग्यूचे रुग्ण होते. यावेळी 28 जण डेंग्युने दगावले. तर 2012-13 मध्ये डेंग्युचे रूग्ण 4867 होते. यावेळी 74 जणाचा डेंग्युने बळी घेतला. 2500 मुंबईकरांमागे डेंग्युचा 1 रूग्ण आढळत असल्यामुळे पालिकेने शाळकरी विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात डेंग्यु रोखण्यासाठी रस्त्यावर उतरवलं आहे. या विद्यार्थ्यांना डेंग्युच्या आजाराबद्दल माहीती नसताना पालिकेन डेंग्यु प्रतिबंधक यात्रेत विद्यार्थ्यांना जुपलं आहे.
विघार्थ्यांना डेंग्युच्या प्रतिबंधक यात्रेत जुपल्याच पालिकेच्या सहाय्यक आयुक्ततांनी खंडन करत आहे. विद्यार्थी भविष्यातील नागरीक असल्यामुळे ते पालिकेचे प्रचारक असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई महापालिका 1500 कोटी आरोग्यावर खर्च करते. मात्र मुंबईकराची आरोग्याची काळजी घेण्याएवजी डेंग्यु, मलेरियासह साथीचे आजारवर प्रतिबंध करण्यात अपयशी ठरली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.