www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.
दगडाने ठेचून मोठया निर्दयतेने त्याला ठार मारण्यात आलं होतं. विरेंद्र मोर्या हा नालासोपारा पूर्वेकडील ओस्वाल नगरी येथील नव युवक विद्या मंदिर येथे इयत्ता चौथीत शिकत होता. नालासोपारा पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर याच शाळेत शिकणारे त्याच्याच वर्गातील चार मित्रांनी त्याची हत्या केल्याच समोर आले.
चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच शाळेत शिकणा-या मुलीबरोबर विरेंद्र बोलत होता. हे बोलणचं या चौघांना खटकत होतं. या चौघांनी २० सप्टेंबरला विरेंद्रला स्टेशनजवळच्या सुनसान गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेत नेलं आणि तिथे त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
नालासोपारा पूर्वेकडील स्टेशनजवळच्या गोगटे सॉल्टच्या मोकळया जागेत दिनांक २० सप्टेंबर रोजी विरेंद्र मोर्या या १३ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह मिळाला होता. दगडाने ठेचून मोठया निर्दयतेने त्याला ठार मारले होते. विरेंद्र मोर्या हा नालासोपारा पूर्वेकडील ओस्वाल नगरी येथील नव युवक विद्या मंदिर येथे इयत्ता चौथीत शिकत होता. नालासोपारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर याच शाळेत शिकणारे त्याच्याच वर्गातील मिञांनी त्याची हत्या केल्याच समोर आले.
हत्या करणारी मुले ही १३ ते १५ वयोगटातील आहेत. ही सर्व मुले ओस्वाल नगरी येथे रहात आहेत. तसेच ही मुलं विरेंद्रबरोबर शिकत आहेत. त्याच शाळेत शिकणा-या मुलींबरोबर विरेंद्र हा बोलत असे. ही बोलणे या चौघा अल्पवयीन मुलांना खटकत होते. या चौघांनी २० सप्टेंबरला विरेंद्रला स्टेशनजवळच्या सुनसान गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेत नेलं आणि तेथे त्याला आपल्या मैत्रिणीबरोबर न बोलण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांच्यात भांडण झाले. याचवेळी चौघांनी विरेंद्रच्या डोक्यावर दगड घातला. त्याला दगडाने ठेचून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ