मुंबई : 'आता वाजले की बारा' म्हणत प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि मना-मनात पोहचलेली अमृता खानविलकर 'नच बलिये' या डान्सच्या कार्यक्रमात ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारली आहे. आता मराठी प्रेक्षकांना मते देण्याचे आवाहन मराठमोळ्या अमृताने केले आहे.
अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांनी शानदार डान्सचा नमुना दाखवत ग्रँड फिनाले गाठला. आता नच बलियेच्या सातव्या सिझनमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीने विजेत्याची निवड होणार आहे.
अमृताने तिच्या चाहत्यांना तिला वोटिंग करण्याची विनंती केली आहे. मला फक्त तुमच्या एका मताची गरज आहे. त्यासाठी 18002741003 क्रमांकावर MISSED CALL द्यावा लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.