मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी एक खुशखबर. गेली काही महिने चाचण्या सुरु असलेल्या बंम्बार्डिअर (bombardiar) कंपनीच्या लोकल ट्रेनला रेल्वे बोर्डानं हिरवा झेंडा दाखवलाय.
सध्या धावत असलेल्या आरामदायी लोकलपेक्षा अधिक आरामदायक, चांगल्या दर्जाच्या लोकल आता ट्रॅकवर धावणार आहेत. MUTP - 2 प्रकल्पाअंतर्गत सुरूवातीला अशा 72 लोकल येणार आहेत.
2013 - 14 मध्ये बंबार्डिअर कंपनीच्या 2 लोकल मुंबईत दाखल झाल्या होत्या. गेले काही महिने या लोकलच्या पश्चिम आणि मध्य मार्गावर चाचण्या सुरु होत्या. या चाचण्या पूर्ण झाल्या असून आता यातून प्रवासी वाहतूक सुरु करण्यात हरकत नसल्याचं पत्र रेल्वे बोर्डाने MRVC ला दिलंय. त्यामुळं येत्या काही दिवसांत या लोकल प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.
पश्चिम रेल्वेचे DC ते AC हे विद्युतीकरण पूर्ण झाले असल्याने या मार्गावर सुरवातीला नवीन लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेचे DC ते AC हे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर या नवीन लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावतांना दिसतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.