मुंबई : राज्य सरकारकडे थकीत असलेले ३५२३ कोटी रूपये तात्काळ देण्याची मुंबई महानगरपालिकेने केली आहे. महापौरांची ही मागणी केली आहे.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थकीत रक्कम देण्याची मागणी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे थकीत रक्कम आहे. त्यापैकी शालेय शिक्षण विभागाकडे २४४५ कोटी रूपये आणि आरोग्य विभागाकडे १२८ कोटी रूपये थकीत आहेत.
ही रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.