शिवाजी पार्कवर लष्कराचा विजय दिवस

लष्कराचा विजय दिवस शिवाजी पार्कवर साजरा होणार आहे. मुंबई हायकोर्टानं लष्कराला सशर्त परवानगी दिली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 4, 2012, 07:15 PM IST

www.24taas.com,मुंबई
लष्कराचा विजय दिवस शिवाजी पार्कवर साजरा होणार आहे. मुंबई हायकोर्टानं लष्कराला सशर्त परवानगी दिली आहे.
१२ ते २० डिसेंबरपर्यंत पार्क वापरण्याची परवानगी मिळाली आहे. हायकोर्टानं लष्करापुढं जवळपास काही अटी ठेवल्यात आहेत. यामध्ये मैदानाला कोणताही धक्का लावू नये, असे बजावून आपला कार्यक्रम साजरा करण्यात यावा असे अटीत म्हटले आहे.
शिवाजी पार्क हा परिसर शांतता क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या आवाजाचे कार्यक्रम करण्यास बंदी आहे. तसेच राजकीय सभांना ही बंदी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने या मैदानाचे नुकसान होवू नये, याचीही काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्रमांना बंदी लागू आहे.
कोणत्या आहेत अटी
१. क्रिकेट पीचला धक्का लागू देऊ नका.
२. कार्यक्रम समाप्तीनंतर महापालिका मैदान पूर्वत करेल.
३. अतिरिक्त देखरेख महापालिका ठेवेल.
४. ध्वनी (आवाज) प्रदूषण कायद्याचा भंग करू करू नका.
५. आर्मी ऑफिसर, पालिका वॉर्ड अधिकारी आणि याचिका कर्ता अशोक रावल पार्कची पाहाणी करतील.
६. खासगी वाहनांना परवानगी देण्यात येणार नाही.
७. लष्कराच्या वाहनांना कार्यक्रमाच्यावेळी परवानगी असेल.