मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसेही एन्ट्री घेणार आहे. 14 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराची पहिली सभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्या सभेबरोबरच मराठी अभिनेतेही मनसेच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत.
सई ताम्हणकर, नेहा पेंडसे, भाऊ कदम, केदार शिंदे, पुष्कर श्रोत्री आणि सायली संजीव हे अभिनेते मनसेचा प्रचार करणार आहेत. प्रचारफेऱ्या आणि जाहीर सभांमधून हे अभिनेते मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मतदारांपुढे मांडणार आहेत.
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017
संध्याकाळी 6.00 वाजता कन्नमवार नगर, विक्रोळीमध्ये जाहीर सभा
संध्याकाळी 7.30 वाजता विलेपार्ले पूर्वमध्ये जाहीर सभा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017
संध्याकाळी 6.00 वाजता दिवा, ठाणेमध्ये जाहीर सभा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017
नाशिकमध्ये जाहीर सभा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017
पुण्यामध्ये जाहीर सभा