१ हजाराच्या ३० कोटीच्या नोटा जाळल्या जाणार

आरबीआयने १ हजारांच्‍या तब्‍बल ३० कोटीच्या नोटा सदोष छापल्‍या आहेत.

Updated: Jan 21, 2016, 02:09 PM IST
१ हजाराच्या ३० कोटीच्या नोटा जाळल्या जाणार title=

मुंबई :  आरबीआयने १ हजारांच्‍या तब्‍बल ३० कोटीच्या नोटा सदोष छापल्‍या आहेत, यातील २० कोटी रिजर्व बँकेकडे तर उर्वरित १० कोटी रुपयांच्‍या नोटा या बाजारात आहेत. 

या प्रकरणी होशंगाबाद आणि नाशिकच्‍या काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्‍यात आले. दरम्‍यान, आता या सदोष नोटा जाळून नष्‍ट करण्‍याची तयारी आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाने केली आहे.

आरबीआयच्‍या सूत्रांनुसार, १ हजारांच्‍या 5AG आणि 3AP सीरीजच्‍या नोटा सिल्वर सिक्युरिटी थ्रेडविनाच छापल्‍या गेल्‍या. हा करंसी पेपर सुरुवातीला होशंगाबादमध्‍ये सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधून निघाला.

हा पेपर नाशिक येथील आरबीआय प्रेसमध्‍ये पोहोचला. आता या सदोष नोटांना परत जमा केले जात आहे. रिजर्व बँकेने या नोटा जमा करायला सुरुवात केली आहे. आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाने या नोटांना जाळण्‍याचा निर्णय घेतला आहे.