मुंबई : कल्याण-ठाण्याहून दादर-सीएसटीला जाणाऱ्या महिला प्रवाशांना दिलासा मिळालाय.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून लोकल प्रवाशांना प्रवासाची परवानगी प्रयोगिक तत्वावर देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. त्यानुसार महालक्ष्मी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस आणि लातूर एक्सप्रेसमधून लोकल पासधारक महिलांना प्रवासाची मुभा देण्यात आलीये.
कल्याणला सकाळी पाऊणे सहा ते पाऊणे सात दरम्यान, या गाड्या येतात. मात्र हा प्रवास मोफत नसेल. पासच्या जोडीला महिला प्रवाशांना कुपन्स घ्यावी लागतील.
सेकंड क्लाससाठी 30 रुपये, तर फर्स्ट क्लाससाठी 20 आणि 10 रुपयांची कुपन्स असतील. सुरूवातीला केवळ 3 हजार कुपन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातली काही कुपन्स शिल्लक राहिल्यास ती 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांना देण्यात येतील.