ट्रॅकवर झाडं कोसळलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Updated: Jun 10, 2014, 08:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
परळ जवळ ट्रॅकजवळ झाड कोसळल्याने, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
प्रवाशांची घरी जाण्याची वेळ असल्याने, दादर स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
हे झाड पडल्यानंतर झाडाच्या फाद्यां ओव्हर हेड वायरपर्यंत पोहोचल्याने अडचण येत आहे.
हे झाडं काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे कर्मचारी करीत आहेत. दरम्यान दादरच्या एक आणि दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर अमाप गर्दी झाली आहे.
कुर्ला आणि घाटकोपर स्टेशनवरही प्रवाशांची गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
स्लो ट्रॅकवरील वाहतूक खोळंबल्याने, स्लो ट्रॅकवरील लोकल गाड्यांमध्येही गर्दी झाली आहे.
संध्याकाळची वेळ असल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांची कोंडी झाली आहे. फास्ट ट्रॅकची वाहतूक यामुळे जास्त प्रभावित झाली आहे.
फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लो ट्रॅकने पुढे नेण्यात येत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.