मुंबई : अंधेरीतील एका हॉटेलात गंभीर बाब समोर आली आहे, बाथरूममध्ये मोबाईल लपवून लावण्यात आला होता, यात महिलांचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार अंधेरीतील एका पबमध्ये घडला असल्याचं सांगण्यात येतंय.
या हॉटेलमधील टॉयलेटच्या बेसिनजवळ एक मोबाईल लावण्यात आला होता, हे एका महिलेच्या निदर्शनास आलं, यानंतर या महिलेने त्यांच्यावर पाळत ठेवली, ही महिला बाहेर आल्यानंतर, एक तरूण साफसफाईसाठी आत गेला, तेव्हा या महिलेने त्या तरूणाला रंगेहाथ पकडलं.
हे प्रकरण समोर आल्यानंतर हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला, या प्रकरणी या तरूणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरूणाच्या मोबाईलमध्ये या काही व्हिडीओही मिळाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.