हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही अभिनेत्रीला अटक

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं देह व्यापाराच्या आरोपात सोमवारी एका टीव्ही अभिनेत्रीला तिच्या दलालासह अटक करण्यात आलीय. 

Updated: Aug 5, 2015, 04:48 PM IST
हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही अभिनेत्रीला अटक title=

मुंबई : मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं देह व्यापाराच्या आरोपात सोमवारी एका टीव्ही अभिनेत्रीला तिच्या दलालासह अटक करण्यात आलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना या अभिनेत्रीविरुद्ध तक्रार मिळाली होती. त्यामुळे, या २७ वर्षीय अभिनेत्रीचा सेक्स रॅकेटमध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचा पोलिसांचाही संशय बळावला होता.

त्यामुळे, सत्य शोधून काढण्यासाठी पोलिसांनी जाळं टाकलं आणि या अभिनेत्रीला रंगेहात अटक करण्यात यश मिळवलंय. 

पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात अभिनेत्रीच्या दलालानं देहविक्रीसाठी १५,००० रुपयांची मागणी केली... त्यानंतर दलालानं अभिनेत्रीला फोन करून बोलावून घेतलं. तेव्हा पोलिसांनी दलाल आणि अभिनेत्रीला अटक केली. दोघांनाही आंबोली पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या राज उपाध्याय या दलालाकडे म्हणून अनेक नवोदित अभिनेत्रींचेही संपर्क सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, उपाध्याय देह व्यापाराचा धंदा करत असल्याचं दिसून येतंय. 

उपाध्याय याला अटक करण्यात आलीय तर अभिनेत्री महिलेला पुनर्वसन केंद्रात धाडलं गेलंय. घटनेची चौकशी सध्या सुरू आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.