टीव्ही अभिनेत्रीनं चार जणांना उडवलं

बॉलिवूड कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत टीव्ही कलाकारही दबंगगिरीत पुढं सरसावतायेत. कुठं हाणामारी तर कुठं कलाकारांची दादागिरी सुरू असतेच. मात्र यावेळी झालाय अपघात.

Updated: Aug 2, 2013, 04:07 PM IST

www.24tass.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत टीव्ही कलाकारही दबंगगिरीत पुढं सरसावतायेत. कुठं हाणामारी तर कुठं कलाकारांची दादागिरी सुरू असतेच. मात्र यावेळी झालाय अपघात.
टीव्ही अभिनेत्री साक्षी पारीखनं कांदिवलीत रिक्षा आणि बाईकला उडवलंय. या अपघातात चार जण जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना कांदिवलीतल्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इजहार अहमद सिद्दीकी, लोकेश यादव, दिलीप कुमार सोनी अशी जखमींची नावं आहेत.

साक्षी कांदिवलीत भरधाव वेगानं गाडी चालवत होती. गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिने ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबले आणि कार समोरील रिक्षा तसंच बाईकला जाऊन धडकली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.