मुंबई : भारतीय नौदलाच्या दोन सुरक्षा नौका डॉकयार्डच्या समुद्रात मंगळवारी बुडाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना पाणी आत शिरले आणि दोन्ही बोटी बुडाल्या.
या दुर्घटनेत कोणीतीही जिवीतहानी झाली नाही, तसेच बंदरातील नौदलाच्या सागरी संपत्तीचे नुकसान झाले नाही.या दोन्ही नौका आकाराने छोटया होत्या. सागरी गस्तीसाठी त्यांचा वापर व्हायचा.
बंदरात उभ्या असलेल्या २ पैकी एका बोटीला आग लागली. ही आग जवळच्याच दुसऱ्या बोटीपर्यंत पसरली. आग विझवताना बुडालेल्या बोटी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.