मुंबई-गोवा चौपदरीकरण दोन वर्षांत : गडकरी

मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम येत्या २ वर्षांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल, असा ठाम निर्धार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

Updated: Jun 4, 2015, 09:16 AM IST
मुंबई-गोवा चौपदरीकरण दोन वर्षांत : गडकरी title=

मुंबई : मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम येत्या २ वर्षांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल, असा ठाम निर्धार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कोकण, गोव्याच्या विकासाला तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, मुंबई-गोवा हायवेच्या चौपदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. भूसंपादनासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी घेण्यात येत आहेत त्यांना समाधानकारक मोबदला दिला जात असून कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई बंदराच्या जमिनीचा विकास पर्यटन, बगिचे तयार करणे आंतरराष्ट्रीय परिसंवाद केंद्र, व्यापार केंद्र अशा कामांसाठी केला जाईल. मात्र या जमिनी कोणत्याही खासगी बिल्डरला देणार नाही. मुंबई बंदरामधून स्वच्छ मालवाहतूक केली जाईल. प्रदूषणकारी पदार्थ, कोळसा आदींची मुंबई बंदरातील वाहतूक रायगड वा रत्नागिरीच्या किनार्‍यावरील नव्याने विकसित होणार्‍या बंदराकडे वळवण्याबाबत विचार सुरू आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टची हजारो कोटी रुपयांची जागा सार्वजनिक कामासाठी वापरली जाईल. राज्य सरकार, मुंबई महापालिकेसह सर्वांना विश्‍वासात घेऊन या बाबतचा निर्णय घेतला जाईल.

गडकरी यांची माहिती
> देशात राष्ट्रीय महामार्गावरचे ६२ टोल बंद केले, त्यापैकी १६ राज्यातील आहे, १३ टोल राज्यातील यापुढच्या काळात बंद करणार
> पुढील सहा महिन्यात ३.५ लाख कोटी रस्त्यांची कामे सुरु होणार
> सोलापूर - बीजापूर चौपदरीकरण येत्या १५ दिवसांत निर्णय घेणार
> विमानाने येतांना वाशी पुलावर वाहनांची मोठी लाइन बघितली, मी PWD मंत्र्यांना सूचना केल्यात , ई टोल सुविधा सुरु करा ( वाहनांवर स्टिकर असतो ) , म्हणजे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत.
 > देशात ३५  ते ४० टक्के ड्राइविंग परवाने बोगस आहेत, RTO बंद करु असे म्हणालो नव्हतो, RTO चा कारभार स्वच्छ पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पावले उचलत आहोत,आम्ही अधिकारी - RTO च्या विरोधात नाही आहोत.
 > नवीन परिवहन कायदा पुढच्या संसदीय अधिवेशनात आणणार, अजूनही काही शंका असल्याने राज्यांना पुन्हा पत्र लिहीत आहे.
> BPT मध्ये १७  एकर जागेवर PPP तत्वावर फाइव स्टार हॉस्पिटल आम्ही बांधणार आहोत,BPT कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता यांना त्यांचा लाभ होणार आहे.शिपिंग कॉर्पोरेशनमधील सर्व गोदी, कंपन्या आता फायद्यात आहेत
> दसऱ्याच्या दिवशी धार्मिक ठिकाणे केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, गंगोत्री या ठिकाणी मोठ्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात करणार
 > मुंबई पोर्टसाठी पर्यायी जागा आम्ही बघत आहोत. BROला नवीन कुठलीही काम दिले नाही, त्यांच्या कामाचा अनुभव चांगला नाही, बॉर्डरची कामे सुरु ती फक्त सुरु आहेत, रोडच्या बाजूला झाडे लावण्यासाठी वेगळे कांट्रेक्टर आहेत. झाडे लावणे.  भूमिअधिग्रहनबाबत शिवसेना बरोबर आहे,तुम्ही मध्ये आग लावू नका. तुम्हाला वाटत तस चित्र नाही. अनेकजण जमीन देत आहेत. हे बिल महत्वाचे आहे.
 > दिल्लीत राज्याचे अनेक विषय प्रलंबित रहाण्याबाबत - आम्ही राज्याचे दूत म्हणून दिल्लीत आहोत,माझी नजर दिल्लीवरच आहे पण महाराष्ट्रात लक्ष आहे, राज्याचे प्रश्न आम्ही सोडवत आहोत, प्रयत्न करत आहोत. एक वर्षात अनेक प्रश्न सोडवले आहेत. आत्ता तुम्ही ट्रेलर बघत आहात. अजुन पिक्चर बाकी आहे. 
 > महागाई दर खाली म्हणजे ४.३ पर्यंत आला आहे.
> प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे १६ कोटी लोकांनी बॅंकमध्ये खाते उघडले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.