www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत अचानक बदल झालाय. जादूटोणाविरोधी कायद्यात खटकण्यासारखं काहीच नाही, असा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झालाय. शिवसेनेनं या विधेयकावर अचानक कोलांटउडी कशी काय मारली, याची चर्चा आता रंगू लागलीय.
जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतरही शिवसेना याच भूमिकेवर कायम होती.... उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला आठ दिवसही उलटले नाहीत, तोच उद्धव ठाकरेंनी या भूमिकेप्रकरणी चक्क कोलांटउडी मारलीय.
जादूटोणा कायद्यासंदर्भात अंनिसशी चर्चा केल्यानंतर या कायद्यात खटकण्यासारखं काहीच नाही, असा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झालाय. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारनं कधी नव्हे इतक्या वेगानं जादूटोणा कायदाविरोधी वटहुकून जारी केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जादूटोणा कायद्याला विरोध नसल्याचं राज ठाकरेंनीही स्पष्ट केलं. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनाही भूमिका बदलावी लागली. याआधी विरोध करताना शिवसेनेनं जादूटोणा कायदा नीट समजूनच घेतला नव्हता, हेच उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं. आणि पर्यायानं शिवसेनेचं हसंच झालं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.