'मग युती करायला कशाला आला होतास'

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्द्याआडून शिवसेनेचा महापौर बंगल्याच्या जागेवर डोळा असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता.

Updated: Feb 18, 2017, 10:29 PM IST
'मग युती करायला कशाला आला होतास' title=

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्द्याआडून शिवसेनेचा महापौर बंगल्याच्या जागेवर डोळा असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. या आरोपाला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. महापौर बंगला गिळण्याचा आरोप करत आहेस, मग युती करायला कशाला आला होतास, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

बीकेसी मैदानावर 21 तारखेला होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची शेवटची प्रचारसभा झाली. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरच भाजप आणि मुख्यमंत्र्यांवरही टीका केली.