उद्या `कृष्णकुंज`वर नगरसेवकांची तातडीची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या मुंबईतील नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2013, 07:41 PM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या मुंबईतील नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांनंतर १ वर्षातील कामगिरीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर घाटकोपरचे नगरसेवक सुरेश आवळे यांना लाच घेताना झालेली अटक तसंच अबु आझमी यांना देण्यात आलेलं 168 कोटींचं कंत्राट आणि कर्नाटक कंपनीला मिळालेलं कंत्राट या मुद्दांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईत मनसेचे एकूण 28 नगरसेवक आहेत.

दरम्यान, नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येऊनही एक वर्ष होत आलंय. मात्र ह्या वर्षभराच्या कालावधीत मनसेनं घोषणा व्यतिरिक्त कुठलीच काम केली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे. वर्षपूर्ती झाली स्वप्नपूर्ती कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.