मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. 

Updated: Jul 22, 2015, 01:38 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. 

सकाळी ११ च्या सुमारास देशमुख कृष्णकुंजवर दाखल झाले. सुमारे अर्धा तास या दोघांमध्ये सुरू होती. कुलगुरू मनसे अध्यक्षांची भेट घेतायत म्हटल्यानंतर साहजिकच या भेटीबद्दल उत्सुकता आणि आश्चर्य व्यक्त होत होतं. यावर, शैक्षणिक विभागावर कृती आराखडा तयार केलाय.  कुलगुरू पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्याबाबतचीच माहिती विविध क्षेत्रातील मान्यवरांना देत असल्याचं कुलुगुरुंनी सांगितलं. 


राज ठाकरे, अमित ठाकरे, संजय देशमुख

या भेटीदरम्यान कुलगुरुंनी राज ठाकरे यांना, ' युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ऑर्नामेंट ऑफ सिटी'  हे पुस्तक भेट म्हणून दिलं. 

राज ठाकरेंबरोबरच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेटीसाठी वेळ मागितली असल्याचंही कुलगुरुंनी या भेटीनंतर स्पष्ट केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.