www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. पालिकेनं धोकादायक घोषित केलेल्या इमारती बिल्डर आणि पालिकेच्या अधिका-यांच्या संगनमतानं धोकादायक ठरवल्याचं पोलखोल झी 24 तासनं केल होत. त्यानंतर काही रहिवासी कोर्टात गेले होते. त्यावर रहिवाशांना दिलासा देत न्यायालयानं पाणी त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले...
विलेपार्ले पूर्वमधली हीच ती पार्वती निवास इमारत .या पार्वती निवास बिल्डिंगला महापालिकेनं धोकादायक ठरवलं होत. आणि लगेचच रहिवाशांचं पाणी कनेक्शनही तोडून टाकलं. इथल्या रहिवाशांनी जेव्हा पार्वती निवासचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं.त्यावेळी पार्वती निवास धोकादायक नसल्याचं निष्पन्न झालं. या बिल्डिंगची दुरूस्ती करून रहिवाशांना राहता येईल, असा निष्कर्ष सरकारी एजन्सीनंच दिलेल असताना बिल्डर वृषभ शहा पालिकेच्या अधिका-यांशी संगनमत करुन रहिवाशांना घरं रिकामी करायला भाग पाडल होत. मात्र झी 24 तासच्या वृत्तानंतर रहिवाशांनी न्यायालयात याचिका धाव घेतली. न्यायालयाने पालिकेला फटकारत पाणी कोणत्या निकषांवर तोडलं असा सवाल केलाय. तसंच रहिवांशाना इमारत दुरुस्तीचे आदेश सिटी सिव्हील न्यायालयानं दिले आहेत...
बिल्डर आणि पालिकेच्या अधिका-य़ांनी चुकीच्या पद्धतीनं नोटीसा जारी केल्या आहेत. या नोटीसा रद्द कराव्यात, असा आदेश स्थायी समितीनं दिलेला असताना मुंबईतील अडीच हजार इमारती पालिकेनं धोकादायक ठरवल्या. पार्वती निवासच्या स्ट्रक्चरल ऑडिटन पालिकेच्या धोकादायक इमारतीं मागचं सत्य समोर आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.