नवी दिल्ली : सिनेमागृहात प्रेमाचे रंग दाखवणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 'लव्ह बर्डस'ने यापुढे सिनेमागृहात सावध राहणे आवश्यक आहे, कारण एका आघाडीच्या चित्रपटगृहाने नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्यास सुरूवात केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रेक्षक चित्रपटगृहात कसे बसले आहेत, हे टिपण्यासाठी या कॅमेऱ्यांना पडद्यावरील प्रकाशसुद्धा पुरेसा आहे, म्हणजे साध्या डोळ्यांना जे दिसत नाही, ते या कॅमेऱ्यात टिपण्यात येतं.
त्यामुळे एखादा रोमॅटिक सिन तुम्ही तुमच्या साथीदारासोबत निश्चितच एन्जॉय करू शकत नाही, याबाबत मल्टीप्लेक्स चालकांनी कुणाची परवानगी घेतली आहे का हे देखिल पाहणे आवश्यक आहे.
हे कॅमेरे नक्की लावल्याची माहिती अजून स्पष्ट नसली, तरी ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. त्या ठिकाणी सूचना देणे आवश्यक असते, प्रेक्षागृहात प्रेक्षक जरी अंधाऱ्यात बसत असतील, तरी याबाबत प्रेक्षकांना माहिती न देता अंधारात ठेवता येणार नाही.
कारण मल्टीप्लेक्समध्ये जर नाईट व्हिजन कॅमेरे लावले असतील, तर त्याची माहिती चित्रपट सुरू होण्याआधी प्रेक्षकांना देणे आवश्यक असावी. आपले मोबाईल फोन स्वीच ऑफ अथवा सायलेंट करण्याची सूचना प्रेक्षागृहात देण्यात येत असते.
एकीकडे किस ऑफ लव्ह साठी आंदोलनं उभारली जात असतांना, अंधाऱ्यातली अशी दृश्य टिपण्याचं धाडस मल्टीप्लेक्स मालक का करतायत, या प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.