सत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी

 आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 9, 2017, 09:25 PM IST
सत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी  title=

मुंबई :  आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली. 

सभेत बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांच्या टीकेचा धागा पकडला, अशोक चव्हाण म्हणतात, सत्तेत पण राहायचं आणि विरोधही करायचा. दोन्ही कामे हेच करतात. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले. होय आम्ही दोन्ही कामे करतो. तुम्हांला विरोध करायला कोणी रोखलं आहे. आपण तर आदर्श कामे करतात आपल्या विरोध कुठे जमणार आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.  
 
यावेळी ते म्हणाले, आमच्यावर टीका होते की हे सरकारमध्ये पण आहे आणि विरोधही करतात.  तर जिथे जिथे खोटं दिसेल ते पाहून आम्ही टीका करणार.... आमची भूमिका सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्याची आहे. त्यामुळे मी तो अंकूश ठेवणार...   मी या सत्तेच्या हत्तीवर अंकुश ठेवणार कारण मागे अंबारीत माझी माय बाप जनता आहे. हत्ती जर उधळला तर माझ्या जनतेला त्रास होईल म्हणून मी अंकुश ठेवणारच असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका स्पष्ट केली.