कामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश

कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्यासाठी खंबाटा एव्हिएशनची मातोत्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. या बैठकीत चर्चा सुरु होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत.

Updated: Jan 5, 2017, 10:25 PM IST
कामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश title=

मुंबई : कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्यासाठी खंबाटा एव्हिएशनची मातोत्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. या बैठकीत चर्चा सुरु होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत.

मुंबईतल्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचा-यांवरून भाजप-शिवसेनेत पुन्हा श्रेयाचं राजकारण सुरू झालंय. खंबाटा कंपनीतल्या कर्मचा-यांच्या थकीत वेतनाच्या मुद्यावरून आपच्या नेत्या अंजील दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठातरे यांनी भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला खंबाटातल्या कर्मचा-यांचे प्रतिनिधीही हजर होते. 

मात्र थकीत वेतनाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनाला शह दिला. मुख्यमंत्र्यांनी कर्मचा-यांचे थकीत वेतन त्वरीत देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशन कंपनीला दिले. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडीच करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे मातोश्रीवरील बैठक झाल्यानंतर बाहेर आलेल्या अंजली दमानियांसोबत भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. त्यामुळं त्याही नाराज झाल्या. मात्र उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दमानियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.