मुंबई: आपलं लग्न कसं खास ठरावं यासाठी प्रत्येक जोडप्याची काही स्वप्न असतात. त्यासाठी अनेक जणं विविध क्लृप्त्या लढवतात. नुकतंच एका जोडप्यानं 'अंडर वॉटर' विवाह करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय.
थायलंडमध्ये ट्रँगद्वारे आयोजित 10व्या अंडर वॉटर वेडिंगचा भाग असलेल्या पूजा राऊत आणि शैलेश कोचरेकरचं कसं झालं लग्न पाहा...
लग्न जरा हटके करावं.... आपल्याच काय ते लग्न सगळ्यांच्याच लक्षात राहावं... यासाठी पूजा राऊत आणि शैलेश कोचरेकर यांनी चक्क समुद्रात पाण्याखाली लग्न केलं. अंडरवॉटर वेडिंग... पाण्यात 10 मीटर खोल पाण्यात या दोघांनी एकमेकांबरोबर सात फेरे घेतले. थायलंडमध्ये ही अंडर वॉटर वेडिंग सेरीमनी पार पडली.... यामध्ये 22 देशांतल्या 34 जोडप्यांनी लग्न केलं. त्यामध्येच पूजा राऊत आणि शैलेश कोचरेकर यांनीही लग्न केलं.
समुद्रातल्या या लग्नासाठी साधारण पाऊण तास लागला.... तर त्यासाठीचा खर्च 85 हजार इतका आला. विशेष म्हणजे एकदा का या लग्न सोहळ्यासाठी तुम्ही नाव नोंदणी केलीत, की प्री वेडिंग फोटोग्राफी, वधू-वरासाठीचं अंडरवॉटर हेल्मेट, लग्नासाठीचा भटजी या सगळ्याची व्यवस्था थायलंड टुरिझम करतं. इतकंच नाही तर एअरपोर्टवर पोहोचल्यापासून ते राहण्याखाण्यापर्यंत आणि लग्नापर्यंतची सगळी व्यवस्था केली जाते.
पूजा आणि शैलेश इतके हौशी आहेत, की त्यांना सात पद्धतीनं लग्न करायचंय... आतापर्यंत त्यांचं महाराष्ट्रीयन आणि थायलंडमध्ये अंडरवॉटर लग्न झालंय.
एखाद्या परीकथेसारखी ही शैलेश आणि पूजाची गोष्ट... हौसेला मोल नसतं, हेच खरं...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.